LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आईचा मृतदेह मुलीने संपविले जीवन, तर भावाचा अपघात, खुलताबाद तालुक्यांत शोककळा

आईचा मृतदेह मुलीने संपविले जीवन, तर भावाचा अपघात, खुलताबाद तालुक्यांत शोककळा, संभाजी पुरीगोसावी (छ.संभाजीनगर जिल्हा) प्रतिनिधी. छ. संभाजीनगर खुलताबाद
 तालुक्यांतील गल्लेबोरगांव येथे आईच्या मृत्यूनंतर मुलीनेही विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे, ही घटना संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यांतील गल्लेबोरगांव येथे गुरुवारी रात्री घडली आहे, आईच्या आत्महत्येनंतर मुलीनेही विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे, एवढेच नाही तर आई आणि बहिणीच्या मृत्यूची बातमी समजताच गावी निघालेल्या भावाचाही अपघात झाला आहे, तो गंभीर जखमी झाला आहे, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसुन, या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, या घटनेने गल्लेबारगांवसह परिसरांत शोककळा पसरली आहे, वंदना भरत दुधारे (वय ३६) ( आई ) आणि पल्लवी भरत दुधारे ( वय १८ ) अशी विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून भरत दुधारे हे पत्नी मुलबाळ आई-वडिलांसह गेल्या अनेक दिवसांपासून शेतात वास्तव्यांस आहे, गुरुवारी रात्री सर्व कामे आटपून वंदना आणि पल्लवी या झोपायला गेल्या होत्या, सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई दिसून न आल्याने तिने आसपास शोध घेतला, त्यावेळी जवळच्याच विहिरीत आईचा मृतदेह दिसला, आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पल्लवीने ही विहिरीत उडी मारत आत्महत्या केली, यावेळी भरत दुधारे यांनीही आपल्या पत्नी आणि मुलीची शोधाशोध केली असता, त्यांना शेतातील विहिरीत दोन्ही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले यावेळी त्यांनी गावातील पोलीस पाटील सिंधुताई बढे कळविल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली,
दरम्यान ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहर काढून शवविच्छेदन साठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून देण्यात आले होते.
घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश आव्हाड व रमेश वऱ्हाडे हे करीत आहे.
या माय लेकीच्या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments