सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करू नये :- मल्लिकार्जुन खरगे
पक्षाच्या मूळ तत्वांचे प्रतीक असलेला दिग्गज काँग्रेस नेता म्हणजे सुशीलकुमार शिंदे असे म्हणत ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांनी पुस्तकात शुभेच्छा दिल्या
नवी दिल्ली, दिनांक ०९ सप्टेंबर २०२४
दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांनी शब्दांकन केलेले सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर इंग्रजी आणि हिंदी पुस्तक "FIVE DECADES IN POLITICS" ("राजकारणातील पाच दशके") असे शीर्षक असलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह आणि शिक्षणतज्ञ विजय धर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे संपन्न झाली.
सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशन वेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सुशीलकुमारजी ज्या काँग्रेसचे आपण सदस्य आहात, ज्यात वाढलात, रुजलात, याच काँग्रेस पक्षाने मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि देशाच्या गृहमंत्री, लोकसभेचा पक्षनेता या पदापर्यंत पोहोवचले आणि उपराष्ट्रपतीचा उमेदवार म्हणून आजपर्यंत निवडणूक लढवलेल्या उमेदवारात आपणाला आजपर्यंत सर्वात जास्त ३०५ मते मिळाली यातच सुशीलकुमार शिंदे यांचे व्यक्तित्व आणि क्षमता दिसून येते. त्यामुळे अजून काय हवे आहे. राजकारणात पन्नास पंचावन्न वर्षे टिकणे अवघड आहे पण दलीत समाजातील सुशीलकुमार शिंदेजी आपल्या जीवनात अनेक संघर्ष, हालअपेष्टा सहन करत, आपल्या शांत आणि हसमुख, संयमी स्वभावामुळे, निष्ठेेमुळे अनेक मोठ्या पदावर पोहोचले. त्यामुळेच आयुष्यभर महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करत आहेत. सध्या देशात वेगळ्या विचारधारा मानणाऱ्या लोकांचा जोर सुरू आहे. त्याविरुद्ध आणि काँग्रेस पक्षाच्या मजबुतीसाठी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जरी सुशीलकुमार शिंदे यांचे वय ८४ वर्षे झाले. तरीही ज्यांचा आपल्या विचारधारेवर विश्वास आहे, ज्याला देशाची, लोकांची सेवा करायची आहे. त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करावे लागेल म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून रिटायर होण्याची गोष्ट करू नये. त्यांनी आयुष्यभर जे शिकले, सहन केले, जे मिळविले ते लोकासांठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपण यापुढे ही काम कराल असा विश्वास आहे असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनावर आधारित राजकारणातील पाच दशके या पुस्तकात त्यांच्या राजकीय प्रवासाची सखोल माहिती दिली या माहितीमुळे सर्वांना प्रेरणा मिळेल असे विचार व्यक्त केले.
हे पुस्तक २४० पानी असून एकूण आठ विभागात आपल्या राजकीय कारकीर्दीतील विविध विषयावरचे लेखन सुशीलकुमारजींनी यात केले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या शुभेच्छा एका पानावर आहेत. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छोटेखानी प्रस्तावना या पुस्तकाला आहे.
सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीचे हे इंग्रजी आणि हिंदी पुस्तक सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या राजकीय वारसदार असलेल्या आणि सध्या सोलापूरच्या खासदार असलेल्या लाडक्या कन्येला - प्रणिती शिंदे यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिका अतिशय सुंदर आणि भावनापूर्ण अशी झाली आहे.
यावेळी फाऊंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त अनिंदिता चॅटर्जी, फाउंडेशनच्या दिल्ली एनसीआर प्रकरणाच्या मानद संयोजक नीलिमा दालमिया, अर्चना दालमिया, अनंतमाला पोतदार, करुणा गोयंका आणि प्रकाशक हार्पर कॉलिन्सचे श्री उदयन मित्रा यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले.
@SushilShindeINC
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments