LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*नारायण चिंचोली येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन सोळा संपन्न. *प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 70 लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र प्रधान.


पंढरपूर प्रतिनिधी -नारायण चिंचोलीत नूतन ग्रामपंचायत कार्यालयासह १ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून ७० लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र प्रदान 
पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरामुळे पंढरपुर तालुक्यातील नारायण चिंचोली हे गाव जसे देशभरात ओळखले जाते तसेच या गावाने आता पर्यंत पटकवलेल्या विविध पुरस्करामुळे देखील नारायण चिंचोली चर्चेत राहिले आहे.नारायण चिंचोली ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विकास कामांसाठी विद्यमान सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य तसेच गावातील विविध पदाधिकारी हे राजकीय पक्ष,गट बाजूला ठेवून एकदिलाने काम करीत असल्याचे पहावयास मिळते.यातूनच मागील कालावधीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे,सरपंच नर्मदाताई धनवडे,उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक संतोष गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाल्याचे दिसून आले आहे.   सोमवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय योजनेतून २५ लाख रुपये खर्चाच्या नूतन ग्राम पंचायत कार्यालयाचे भूमिपूजन तसेच जनसुविधा योजनेतून ग्रामी पंचायत कार्यालयासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे,१० लाख रुपये,जनसुविधा योजनेतून स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे १० लाख रुपये या कामाचे भूमिपूजन विविध ग्राम पंचायत सदस्य तसेच जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून नारायण चिंचोली ग्राम पंचायतीच्या माध्यमातून ७० घरकुलांना नव्याने मंजुरी मिळाली असून या लाभधारकांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.तर नूतन ग्राम पंचायत कार्यालयाचे ठेकेदार विश्व्जीत धोत्रे यांचा सत्कार कऱण्यात आला.        यावेळी ग्राम पंचायत माजी सरपंच धर्मराज नलवडे, माजी सरपंच बळवंत धनवडे, ग्रामपंचायत सदस्य कौशल्य दिलीप गाजरे,संतोष ब्रम्हदेव चव्हाण,कांचन दत्तात्रय कोळेकर,अलका विठ्ठल माने,अमृता अमोल गायकवाड,बळीराम हनुमंत बनसोडे,शुभांगी नवनाथ कोले यांच्यासह सौदागर गुंड,हरी माने,दत्तात्रय गुंड,सुभाष नलवडे,नारायण कोळेकर,अप्पा वाघमोडे,शिवाजी भोसले,श्रीधर कोळेकर,नारायन गुंड,सुनील माने,मुकुंद घाडगे,सचिन भडकवाड,बापू बनसोडे,महेश माने,सचिन घाडगे,रमेश नाझरकर,नवनाथ नलवडे,नाथा बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments