*न्यू सातारा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड.... न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट(पॉलीटेक्निक) कोर्टी, पंढरपूर मधील विविध विद्यार्थ्यांची लाईफकोड सॉफ्टवेअर कंपनी नऱ्हे,पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे . कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आस्था ढेरे,ज्ञानेश्वरी देशमुख ,सिद्धी कवठेकर , वैशाली शेवाळे, वैभव दगडे, प्रवीण देशमुख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.विशाल बाड सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून विशाल बाड सर यांच्या अथक प्रयत्नाने अनेक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड होत आहे. शिक्षण चालू असतानाच नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच विशेषत:पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे . विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजाराम (नाना) निकम ,प्राचार्य प्रा. विक्रम लोंढे सर, संस्था प्रतिनिधी मा. ज्ञानेश्वर शेडगे साहेब .ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विशाल बाड सर, रजिस्ट्रार श्री संतोष कवठेकर सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.*
0 Comments