प्रतिनिधी/-
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंढरपूरात सर्वपक्षाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आमदार अभिजीत पाटील बोलताना म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले...
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की अजूनही दादा आपल्यातच आहेत त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाही. देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या माढा मतदारसंघाची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी आहे.
यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दत्तात्रय सावंतसर, नगराध्यक्ष प्रणिती भालके, प्रणव परिचारक, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, जिल्हासंपर्क प्रमुख महेश साठे, प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, वर्षाताई शिंदे, ॲड.दीपक पवार,देवानंद गुंड, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,हनुमंत पवार, श्रीकांत शिंदे, रणजीत बागल, बशीर शेख, अनिता पवार, चारुशीला कुलकर्णी यासह अनेक पदाधिकारी, तरूण सहकारी उपस्थित होते.
शोकसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन, या दु:खातून सावरण्याचे बळ त्यांना लाभो, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

0 Comments