LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

• न्यु साताऱ्याच्या सात विद्यार्थ्यांची कॉग्निशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे कंपनीत निवड



 पंढरपूर - कोर्टी- येथील न्यु सातारा पॉलिटेक्निक येथे कॉग्निशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे या कंपनीने विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून विविध विभागातील सात विद्यार्थ्यांची या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे प्राचार्य मा. श्री . विक्रम लोंढे यांनी दिली.
यामध्ये लजीना सय्यद, साहिल आयवळे, आकाश वाघमारे, प्राची भोसले ,पल्लवी काळेल, ऋषिकेश लोखंडे व वैष्णवी कलागते या विद्यार्थ्यांची थेट ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून निवड झाली आहे.
न्यु सातारा महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी आज विविध कंपन्यांमध्ये आपले उत्तम करिअर घडवीत आहेत . महाविद्यालयामध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, मानांकने ,संशोधने याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंट कडे देखील अधिक लक्ष दिले जाते. ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर यांचे अथक प्रयत्न, विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि न्यु सातारा महाविद्यालयातील शैक्षणिक कल्चर यामुळे न्यु सातारातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे पालक वर्गात सुद्धा आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 त्यांच्या याच यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. राजाराम निकम साहेब यांनी त्यांचे कौतुक केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच संस्थेचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडगे साहेब, प्राचार्य विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर ,सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ही त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments