LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज... विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे खूप गरजेचे असल्याचे मत प्राचार्य प्रा. विक्रम लोंढे सर यांनी व्यक्त केले. न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी

पंढरपूर येथे विद्यार्थ्यांसाठी 07 फेब्रुवारी 2025 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीत व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते ,त्याप्रसंगी ते बोलत होते. या व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन सत्रास मा.सचिनकुमार पाटील( मॅनेजिंग डायरेक्टर टेक मेक वर्ल्ड, पुणे व मा.अभिषेक तालीकोटी (प्रोजेक्ट मॅनेजर टेक मेक वर्ल्ड ,पुणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पुढे बोलताना लोंढे सर म्हणाले, व्यक्तिमत्व विकास ही एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, वैशिष्ट्यपूर्ण विचार आणि वर्तन पद्धती कशा विकसित होतात याची एक प्रक्रिया आहे .ही प्रक्रिया सतत बदलत असते आणि ती जीवन अनुभवावर प्रभाव टाकत असते. व्यक्तिमत्व केवळ आपल्या वातावरणात आपण कसे हालचाल करतो आणि कसा प्रतिसाद देतो यावर प्रभाव पाडत नाही तर आपल्याला काही विशिष्ट मार्गाने कार्य करण्यास प्रवृत्त करते . व्यक्तिमत्व विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. व्यक्तिमत्व विकासामुळे व्यक्ती अधिक आत्मविश्वासु ,समाधानी आणि यशस्वी बनू शकते. व्यक्तिमत्व विकासामुळे व्यक्ती अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकते. समस्या सोडू शकते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून कॉलेजने आयोजित केलेल्या या मार्गदर्शन सत्राचे विद्यार्थ्यांबरोबरच विशेषत: पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी संस्था प्रतिनिधी मा. श्री ज्ञानेश्वर शेडगे साहेब,उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.विशाल बाड सर , रजिस्ट्रार श्री.संतोष कवठेकर सर, सर्व विभाग प्रमूख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Post a Comment

0 Comments