LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

न्यु सातारा पॉलीटेक्निकचा श्रेयस पावर सोलुशन, कोर्टी या कंपनीसोबत सामंजस्य करार

न्यु सातारा पॉलीटेक्निकचा श्रेयस पावर सोलुशन, कोर्टी या कंपनीसोबत सामंजस्य करार


सध्या देशात व जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यात, लहान गाव-गावात, रस्ते-खेड्यापाड्यात जर वीज पोहोचवायचे असेल तर तुम्हाला तेथे ट्रान्सफॉर्मर ची गरज भासते.हे ट्रान्सफॉर्मर्स आपल्या घर, ऑफिस तसेच इतर सर्व ठिकाणी वीज पोहोचवण्यासाठी खूप गरजेचे असतात. जर तुमच्या आजूबाजूला ट्रान्सफॉर्मर नसतील तर तुमच्या घरातील सर्व विद्युत उपकरणं चालूच होणार नाही. सध्याच्या काळातील ट्रान्सफॉर्मरची ही वाढती मागणी पाहता न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निक या संस्थेने श्रेयस पावर सोलुशन या कंपनीचे सामंजस्य करार केलेला आहे .या कंपनी द्वारे विद्यार्थ्यांना नोकरी व उद्योग याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा करार करण्यात आला असल्याचे यावेळी संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच या संदर्भात बोलताना प्राचार्य लोंढे म्हणाले की, हे प्रशिक्षण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागातील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे इन प्लांट ट्रेनिंग सुद्धा देण्यात येणार आहे तसेच या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भविष्यामध्ये नोकरी व व्यवसायामध्ये फार मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांच्या मार्गदर्शनातून हा करार करण्यात आला. हा करार करतेवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments