*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी सोलापूर लोकसभा खासदार मा.प्रणितीताई शिंदे यांना खासदार निधीतून देण्यासाठी आज सोलापूर येथे खा. प्रणितीताईंना भेटून निवेदन देण्यात आले.*
*खा.प्रणितीताईंनी लोकशाहीर अण्णाभाऊंच्या पुतळा स्मारकाचे सुरू असलेल्या कामाची माहिती घेवून चर्चा केली व भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.*
*यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष व मा. नगरसेवक नागेश भाऊ यादव,काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील व सागर वाघमारे उपस्थित होते.*

0 Comments