जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर महिला मंडळ पंढरपूर संस्थेच्या वतीने महिला मंडळ प्राथमिक शाळा महावीर नगर, पंढरपूर या ठिकाणी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.मेधाताई दाते मॅडम संकल्पनेतून सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी लहान मोठ्या अशा दोन गटात मिळून २१२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अतिशय उत्साही वातावरणात पहाटे ५.३० वाजता योग प्रार्थनेने स्पर्धेत सुरुवात झाली. या स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आल्या अतिशय अटीतटीच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योग शिक्षिका डॉ.ज्योती गवळी मॅडम आणि अंबिका योग कुटीर चे प्रशिक्षक श्री पाटील, श्री.धावणे, श्री कटप, श्री बिडवे, श्री कुलकर्णी आणि अकलूज येथील सौ माधुरी पिसे यांनी परीक्षकाचे काम अतिशय उत्तम रीतीने पार पाडले. स्पर्धा अतिशय निकोपणे पार पडल्या. या स्पर्धेत शारीरिक स्वास्थ्यासाठी योग व योगासाठी शरीर कसे तयार असावे याचे मार्गदर्शन ही त्यांनी केले.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणापत्र आणि शिल्ड तसेच मोठ्या गटासाठीप्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे ५०००,२५००,१००० रुपयांची रोख बक्षिसे आणि लहान गटासाठी प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे २५००,१०००,५०० रुपयाची बक्षीसे देण्यात आले.
लहान गटामध्ये शिवन्या कलुबर्मे प्रथम क्रमांक, भावना पवार द्वितीय क्रमांक, राजनंदिनी जाधव तृतीय क्रमांक मिळवला तसेच मोठ्या गटांमध्ये गायत्री भारत सावंजी हिने प्रथम क्रमांक, समर्थ संतोष गवळी याने द्वितीय क्रमांक, पृथ्वीराज सचिन चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळवला .
कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका मेधा दाते मॅडम यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि संस्थेचे कार्य प्रास्ताविकात मांडले. संस्थेच्या सचिवा डॉ. सौ. वर्षा काणे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.कुलकर्णी,सौ.मोरे, श्री कोळी व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

0 Comments