LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंदिर समितीचा भोंगळ कारभार, शासनाचे दुर्लक्ष ; पंढरपुरच्या स्थानिक नागरिकांच्या दर्शनात गोंधळ, देवाच्या लग्नात देवाला बाशिंग च नाही!



पंढरपूर (प्रतिनिधी) : श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती च्या भोंगळ कारभाराबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.

मंदिर समितीच्या भोंगळ कारभाराची आणखी दोन उदाहरणं देत गणेश अंकुशराव यांनी मंदिर समितीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. श्रीविठ्ठल रूक्मिणी च्या दर्शनासाठी पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना सकाळी सहा ते सात ही वेळ ठरवलेली असताना मंदिर समितीचे कर्मचारी स्थानिकांना पहाटे साडेपाच ते सहा वाजेपर्यंत म्हणजे अर्धा तासच पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडत आहेत. हा पंढरपुरकरांवर खुप मोठा अन्याय आहे. 

याचबरोबर नुकताच श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यावेळी देवाला बाशिंग च बांधले नसल्याचे दिसून आले आहे. ही मंदिर समितीची खुप मोठी चुक असुन यामागे नेमकं कारण काय? याबाबत मंदिर समिती ने खुलासा करावा, पंढरपूर शहरातील नागरिकांना दर्शनाची वेळ वाढवून देण्यात यावा व मंदिर समितीच्या भोंगळ कारभारावर शासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
.......
फोटो ओळ : २०२४ मधील विवाह सोहळ्यात देवाला घातलेलं बाशिंग व २०२५ मध्ये देवाला बाशिंग न घालता संपन्न झालेला विवाह सोहळा.

................

मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏

कळावे आपला 
- गणेश अंकुशराव 
- मोबाईल - 9370271730

Post a Comment

0 Comments