सोलापूर (प्रतिनिधी ) मौजे कारकल तालुका दक्षिण सोलापूर येथील फिर्यादी व साक्षीदार यांचे भीमा नदीकाठी बसविण्यात आलेल्या 64800/-रू किमंतीची इलेक्ट्रिक मोटारीचे 1620 मीटर केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत मल्लिकार्जुन सुतार रा.कारकल तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 5/2/25 रोजी
मंद्रूप पोलीस स्टेशन, गुरनं 29/2025 BNS 303 (2) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सपोनि श्री मनोज पवार यांनी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना आदेशित केले होते.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांनी गोपनीयरित्या माहिती काढून संशयित इसम अंबन्ना महादेव कोळी रा.कारकल यास ताब्यात घेऊन त्याचे कडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने सदर आरोपीस गुन्ह्याच्याकामी तपासीक अंमलदार सपोफौ एस.बी.काशीद यांनी अटक करून त्याची न्यायालयाकडून तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन अटक व पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल, केबल वायर कट करण्यास लागणारे साहित्य व गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार सायकल असा एकूण 1,24,860/-रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी . अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर . उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सपोनी श्री. मनोज पवार, मंद्रूप पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीरण शाखेचे सपोफौ काशीद, पोकाॅ / संदीप काळे, महांतेश मुळजे, सुनंद स्वामी यांनी बजावली आहे.

0 Comments