LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश..... न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी,

 पंढरपूर मधील विद्यार्थ्यांनी C-Zonal अंतर्गत झालेल्या ॲथलेंटिक्स स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये थाळी फेक मध्ये पल्लवी काळेल प्रथम क्रमांक ,गोळा फेक मध्ये गौरी धनवडे प्रथम क्रमांक , गोळा फेक मध्ये मयुरी चव्हाण द्वितीय क्रमांक ,थाळी फेक मध्ये गणेश पुजारी द्वितीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले . यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रा.विक्रम लोंढे सर यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी अशीच खिलाडूवृत्ती जोपासावी असा सल्ला दिला. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी , साहस ,धाडस ,प्रयत्न हे करावेच लागते परंतु हे करत असताना योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. असेच नेहमी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेबद्दल तोलामोलाचे मार्गदर्शन गणेश पडवळकर सर यांच्याकडून मिळत आहे . त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आतापर्यंत विद्यार्थ्यांनी अनेक क्रीडा स्पर्धेत यश मिळवत पारितोषिके मिळविली आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच प्राचार्य प्रा .विक्रम लोंढे सर यांच्याकडून गणेश पडवळकर सर यांचेही विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजाराम( नाना) निकम, संस्था प्रतिनिधी मा. श्री ज्ञानेश्वर शेडगे साहेब, प्राचार्य प्रा .विक्रम लोंढे सर ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विशाल बाड सर, क्रिडा प्रमुख प्रा.व्ही. एम.कुंभार सर,रजिस्ट्रार श्री. संतोष कवठेकर सर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.*

Post a Comment

0 Comments