LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*महिलांना आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, समानता, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध :- खासदार प्रणिती शिंदे*



*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने नवी दिल्ली येथील शक्ती सन्मान समारोह कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन*

नवी दिल्ली, ०८ मार्च २०२५

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिना'निमित्त देशभरातील महिलांचा सन्मान करण्यासाठी, समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी, आणखी उत्साहाने पुढे जाण्यास प्रेरित करण्यासाठी "शक्ती सन्मान समारोह" कार्यक्रम आयोजित केला होता.

या शक्ती सन्मान समारोहात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि गौरव खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षाअध्यक्षा अलका लांबा, सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments