LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुक्यातिल शिक्षण माफिया चा बंदोबस्त करा ... माऊली हळणवर यांची शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे कडे तक्रार..



प्रतिनिधी ...पंढरपूर 

पंढरपूर तालुक्यातील शिक्षण सम्राटांनी पैसे मिळवण्याचा नवीन फंडा आणलाय... पंढरपूर पंचायत समितीत झालेल्या आमसभेत मांडलेला विषय थेट शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे कडे या शिक्षण सम्राटानी दहावी बारावी च्या तुकडीची मान्यता नसताना इमर्जन्सी ऍडमिशन च्या नावाखाली सुमारे 2000 ते 3000 विध्यार्थ्यांना परिक्षेला बसवण्याचा व सामुदायिक कॉपी करायला लावुन प्रती विद्यार्थी एक लाख रुपये घेऊन मोठा भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काॅपी मुक्त महाराष्ट्र या संकल्पनेचा फौजा उडवला आहे अनेक संस्थाचालकांनी बेकायदेशीर लाखो रुपये घेऊन रित्या नोकर भरती केली आहे तसेच काही संस्था चालकांनी तर कहरच केला आहे शासनाचा भरती बंदचा जिआर असताना सुद्धा दहा वर्षापूर्वी ची तारीख दाखवुन शिक्षण विभागातील भ्रष्टाचारी अधिकार्याना हाताशी धरून पवित्र पोर्टल न भरता बिदुनामावली पायदळी तुडवून घरातील व जवळच्या नातेवाईकांना क्वालिफाईड नसताना सुद्धा नोकरीला घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे व आर्थिक नुकसान केल्याचे दिसून येते अनेक संस्था चालकांनी तर दहा दहा पंधरा वर्षे फुकट नोकरी करणाऱ्या युवकांना वाऱ्यावरती सोडून दुसऱ्याच लोकांकडून पैसे घेऊन भरती केली आहे याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली असता कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही सोलापूर शिक्षण विभाग व पंढरपूर शिक्षण विभाग मुगळून गप बसले असल्याचे दिसून येते काही शिक्षण सम्राटांनी तर डायरेक्ट इतर जिल्ह्यातून अकॅडमी चालवणाऱ्या लोकांकडून एक एक लाख रुपये घेऊन 50 100 विद्यार्थी डायरेक्ट परीक्षेला बसवले व वर्गातील फळ्यावरती कॉपी लिहून दिली 
अनेक रिटायर्ड शिक्षक विद्यार्थीना कॉपी पूर्वत होते या प्रकारचा भ्रष्टाचार करून कोटींची माया जमवली असुन ..हा प्रकार शासनाने नेमलेल्या पथकाच्या लक्षात आल्यानंतर सरकार घ्या कार्यवाही च्या भिती पोटी.. शुल्लक कार्यवाही केली..
शासनाच्या नियमाप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे चालू ठेवणे गरजेचे असताना मुद्दामहून ते बंद करण्यात आले.. होते परंतु नेमलेल्या पथकाने डोळे झाक केली पंढरपूर शिक्षण विभागाने हेतू पुरस्कृत दुर्लक्ष केले पंढरपुरात परवा झालेल्या आम सभेमध्ये भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळी .. प्रशासन खडबडून जागे झाले व कारवाईचा बडगा उगारला असल्याचा फार्स केला असल्याचे दिसून आले 
आम सभेमध्ये सर्व जनतेसमोरच लोकप्रतिनिधींचे व शासनाचे लक्ष वेधले परंतु कुठलीही कारवाई झाली नव्हती आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे माऊली भाऊ हळणवर यांनी सदरच्या प्रकाराची दखल घ्यावी व संस्था चालकांनी संगणमत करून पैसे मिळवण्याच्या हेतूने हा गुन्हा केला असून यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करून परीक्षा पास होण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याल्याचे दिसून येत आहे या संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी असे निवेदन दिले मंत्री महोदयांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी करून सदरच्या शाळांचे दहावी बारावीचे केंद्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या व असे गैरप्रकार करणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशाही सूचना दिल्या असल्याचे समजते... आता गबरगंड झालेल्या संस्थाचालकावर काय कारवाई होते याकडे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे

Post a Comment

0 Comments