सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे हे मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना तात्काळ सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
या गाव भेट कार्यक्रमात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी सभापती अशोक देवकते, सरपंच शोभाताई टेळे, प्रदीप टेळे, सोसायटी चेअरमन शकील कुडले, रेखाताई बासगी, अकिल कुडले, संजय शिरढोणकर, मलिक शेख, सुभाष शिरढोणकर, मुन्ना कुडले, रियाज शेख, शिलवंत शिरढोणकर, सदाशिव कांबळे, इफ्तेकार कुडले, बसवराज कुडले, तारिक कुडले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments