LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट ला टाका- आ.समाधान आवताडे


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पावसाळ्यात अखंडीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावित तसेच नंदुर सब स्टेशनचे काम संथ गतीने सुरू असल्याने सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
     मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या विविध विकास कामे अडचणीच्या संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दिनांक 28 रोजी बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात महावितरण ची सुरू असलेली विविध विकास कामासंदर्भात यांच्या आढावा घेण्यात आला यावेळी पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी आर डी एस एस, डीपीडीसी, घरगुती वीजजोड,आदी सुरू असलेल्या व  नवीन विकास कामांची माहिती यावेळी दिली.यावेळी आ.समाधान आवताडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात आर डी एस एस मधून कोट्यावधीची कामे सुरू आहेत परंतु ही कामे संथ गतीने होत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना,ग्राहकांना बसत आहे. तसेच सबस्टेशन मधील मंजूर वाढीव क्षमतेचे ट्रांसफार्मर बसवण्यास विलंब होत असल्याचे सांगून नवीन डीपी, नवीन लाईन ची कामे वेगाने पूर्ण करावी. मंगळवेढा शहरात एखाद्या ठिकाणी फॉल्ट झाल्यानंतर संपूर्ण शहरातील विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे मंगळवेढा शहर बंद न राहण्यासाठी शहराचे विविध झोन करून त्यानुसार विद्युत पुरवठा व्हावा, तसेच अनेकांच्या घरावरून, घराला चीटकुन विद्युत तारा गेलेले आहेत त्यामुळे धोका होण्याचा संभव असल्याने त्या तारा,पोल शिफ्ट करावेत, तसेच शहरात व ग्रामीण भागात अनेक वेळा मेंटेनन्सची कामे न केल्यामुळे विद्युत पुरवठा बंद राहतो मेंटेनन्स ची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करून विद्युत पुरवठा खंडित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरातील अंडरग्राउंड केबल चे काम तातडीने पूर्ण करावे. धोकादायक पोल, वारंवार तुटणाऱ्या तारा,अडथळा आणणारी झाडे याबाबत  लक्ष देऊन पंढरपूर व मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातील मांसूनपूर्व व  मान्सून काळात मेंटेनन्स ची कामे तातडीने हाती घ्यावीत. तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात नवीन सबस्टेशन होण्यासाठी चे प्रस्ताव  द्यावेत,शेतकरी,वीजग्राहक जळलेले डिपी वेळेत द्यावेत, इथे काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने महावितरण ची यंत्रणा सज्ज ठेवून अखंडित पुरवठा देण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना आ आवताडे यांनी दिल्या. यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मंजूर झालेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी  प्रयत्नशील असल्याचे सांगितले.या बैठकीच्या वेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील उपकार्य कार्यकर्ता महेश शीपुरे, महापारेषण चे कार्यकारी अभियंता रवींद्र घुगाटे, उपकार्यकारी अभियंता ओंकार पवार, शाखा अभियंता प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments