महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले व पवित्र नद्यांचे जल घेऊन ही रथयात्रा निघालेले असून महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तरुण पिढीला समजावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा सुरू असून पंढरपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी लतीफ भाई तांबोळी सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, महाराष्ट्र प्रदेशचे युवक उपाध्यक्ष समाधान काळे, जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे व कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.
यावेळी लतीफ तांबोळी बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि गौरवशाली इतिहास याची माहिती आजच्या तरुण पिढीला मिळावे या हेतूने मंगल कलश रथयात्रेचे आयोजन केले असून आज सोलापूर जिल्ह्यात रथयात्रेचे उत्साहात आगमन झाले आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विजन समोर ठेवून सोलापूर जिल्ह्यातून आज हि रथ यात्रा दिवसभर देवभूमी पंढरपूर संतभूमी मंगळवेढा आणि सोलापूर येथील चार हुतात्म्यांना अभिवादन करून आरणीतील संत सावता माळी यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून लाखो शेतकऱ्यांची वरदानी असलेल्या उजनी धरणातील जल घेऊन पुणे जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांनी सांगितले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या मंगल कलश रथयात्रेचे पंढरपूर मध्ये उत्साहात स्वागत केले असून पंढरपुरातील विठुरायाचा आशीर्वाद घेऊन ही रथयात्रा उत्साहाने पुढे जात आहे. संताच्या समाज कल्याणाच्या विचाराचा वारसा पंढरपूर च्या नगरितून घेऊन ही रथयात्रा पुढे जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी पंढरपूर तालुका अध्यक्ष, अनिल नागटिळक, शहर अध्यक्ष दिगंबर सुडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष शुभम शिरकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे संकेत ढवळे,सहकार शिरोमणीचे व्हा.चेअरमन भारत नाना कोळेकर, संचालक गोरख जाधव, जयसिंह देशमुख, अमोल माने, राजाभाऊ माने, अरुण नलवडे. विक्रम बागल, विठठल साखर कारखान्याचे माजी संचालक, महादेव देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, नारायण शिंदे, अर्जुन जाधव, संजय पाटील,प्रतिभादेवी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन हरिभाऊ मुजमुले, रमेश नागणे, दत्तात्रय चव्हाण, अनंत घालमे, महादेव सुर्यवंशी, संजय म्हमाने,साहेबराव नागणे,निहाल शेख, सुनिल पाटील, शंकर कवडे,नवनाथ माने, अंकुश चव्हाण, गणेश पवार, योगेश जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सिमाताई बागल, तालुका कार्याध्यक्ष गिता कदम, पंढरपूर शहर कार्याध्यक्षा प्रियंका सोळंके, तालुका संघटक राणी सुतार यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments