या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कालवा सल्लागार समिती चे सदस्य माऊली भाऊ हळणवर उपस्थित होते या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता माने सो,उप अभियंता बंकापुरे, यांचे सह सोलापूर जिल्ह्यातील पाणी वापर संस्थाचे चेअरमन व शेतकरी जलसंपदा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. यावेळी बोलताना माऊली हळणवर यांनी पाणी वापर संस्था यांचे अधिकार उजनी पाणी वापर नियोजन यावरती मार्गदर्शन केले तसेच त्यांनी बोलताना सांगितले की सोलापूर जिल्ह्याच्या शेतीच्या पाण्यासाठी सुमारे 60 ते 70 आंदोलने शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून केले दहा ते पंधरा गुन्हे या आंदोलनात दाखल झाले आहेत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याकडे मी सोलापूर जिल्ह्यातील पाण्याविषयी मी केलेले कार्य सांगितल्यानंतर त्यांनी मुद्दाम होऊन मला कालवा सल्लागार समितीच्या सदस्य पदी शासनाच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड केली असल्याचेही त्यांनी पाणी वापर संस्थांच्या चेअरमन व शेतकऱ्यांनी पाणी नियोजन कसे असावे याकरता काही सूचना असल्यास त्या माझ्याकडे कराव्यात मी ते कालवा सल्लागार समिती बैठकीमध्ये माडुंन शासनाच्या व समितीचे लक्षात आणून देईन
असेही सांगितले..
0 Comments