LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी उप पंतप्रधान स्व. बाबु जगजीवनराम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन*


सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. बाबु जगजीवनराम यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, बाबू जगजीवन राम हे अतिशय कष्ठातुन पुढे आलेले नेते होते. त्यांनी देशासाठी, दिन दलित अस्पृश्यासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्वातंत्र्यसैनिक आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होते. स्व. इंदिराजी गांधी यांचे ते अत्यंत विश्वासु सहकारी होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मोची समाजबांधव आणि सोलापुरसह देश त्यांचे स्मरण करतो आहे.

यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, बसवराज म्हेत्रे, हणमंतू सायबोलू, बाबुराव म्हेत्रे, भिमाशंकर टेकाळे, लखन गायकवाड, हारून शेख, रामसिंग आंबेवाले, परशुराम सातारेवाले, गिरिधर थोरात, विवेक कन्ना, रजाक कादरी, नूर अहमद नालवार, शिवाजी साळुंखे, तिरुपती परकीपंडला, शुभांगी लिंगराज, रेखा बिनेकर, चंद्रकला निजमल्लू, चंदा काळे, प्रियांका गुंडला, भीमराव शिंदे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, सचिन सुरवसे, अभिलाष अच्युगटला, राजू निलगंटी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments