LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरातील सर्व बँकांना निवेदन देण्यात आले

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरातील सर्व बँकांना निवेदन देण्यात आले की केंद्र सरकारने नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपली शाखा महाराष्ट्रात असून आपले बहुसंख्य ग्राहक मराठी आहेत परंतु आपण ग्राहकांशी मराठी मध्ये सुसंवाद करत नसल्याचे तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे होत आहेत तसेच आपल्या बँकेच्या ज्या काही योजना आहेत त्या एकतर इंग्रजी अथवा हिंदी मध्ये लिहिलेल्या असतात आमच्या तालुक्यातील बहुसंख्य ग्राहक शेतकरी व अल्पशिक्षित आहे त्यांना आपल्या बँकेच्या योजना इंग्रजी अथवा हिंदी मध्ये असल्याने त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आपल्या बँकेत असणारी परप्रांतीय कर्मचारी आमच्या मराठी ग्राहक बांधवांना हिंदीत बोलण्याचा आग्रह करतात अशा तक्रारी मनसेकडे आलेल्या आहेत आपण आपल्या कर्मचाऱ्यांना मराठीत संवाद साधण्याचा आग्रह करावा मराठी ग्राहकांना अरे रावीची भाषा केल्यास महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेकडून मनसे दणका दिल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अवधूत गडकरी यांनी केले यावेळी मनविसे सोलापूर जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोडे मनविसे पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रताप भोसले पंढरपूर शहराध्यक्ष प्रदीप परचंडे ऋषिकेश बदडे अजित ननावरे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,,,,,,,

Post a Comment

0 Comments