LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*खासदार प्रणिती शिंदे यांच्या विकास निधीतून दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव ते अंत्रोळी दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी भूमीपूजन संपन्न झाले.*


जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून ३०५४/२०८१ ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव ते अंत्रोळी दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले असून त्या निधीतून खडीकरण आणि डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार हा रस्ता होत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

तसेच यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन आस्थेने विचारपूस अडचणी जाणून घेतल्या निवेदने स्वीकारली.

या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास सरपंच सौ मीरा साळुंखे, उपसरपंच तुकाराम भडकुंबे, काँग्रेस दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष अमीर शेख, सहकार दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष दत्ताभाऊ पवार, राष्ट्रवादी दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष बालाजी जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष पवार, विष्णू पाटील, जिलानी मुजावर, समाधान जाधव, माऊली सुतार, अखिल मुजावर, संतोष पवार, समाधान पवार इतर मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments