LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है : प्रणिती शिंदे**मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित दादर मुंबई येथील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग*👉 *खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.*



सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या मा.खा.‌ सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, काँग्रेसकडून हे कोणत्याही किंमतीत सहन केले जाणार नाही. मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ED च्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार व प्रमुख नेते हजारो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज मुंबई येथील टिळक भवन परिसर, इंडियाबुल्स समोर येथे आंदोलन केले. 

तसेच या आंदोलनात सोलापुरातून प्रदेश काँग्रेसचे चिटणीस मा. नगरसेवक विनोद भोसले, राहुल वर्धा उपस्थित होते.

यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments