LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*सुस्ते येथे ॲडिशनल ट्रान्सफॅरमरचे आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते भुमिपूजन**रखडलेल्या कामांना सुरू करून गती देणे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम* - आमदार अभिजीत पाटील.



प्रतिनिधी/-

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना जादा वीज पुरवठा नियमितपणे व्हावा म्हणून अतिरिक्त ५एमव्हीआर ट्रान्सफाॅर्मर उभारण्यात येत असून या कामाचे भुमिपुजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते अक्षयतृत्तीयाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.

सुस्ते येथे असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन मधून या अगोदर वीज पुरवठा अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विजेची मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांसहीत सर्वसामान्य नागरिक व ग्राहक यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत होते. रखडलेल्या कामांना सुरू करून गती दिणे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम करत आलो असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

यावेळी विठ्ठलचे माजी संचालक रामदास चव्हाण, तानाजी चव्हाण, भिमाचे माजी संचालक तुषार चव्हाण, अतुल चव्हाण, धनाजी घाडगे, विजय सुरवसे, डिव्हीपीचे संचालक अनिल यादव, सुरेश सावंत, कुमार सालविठ्ठल, सरपंच डाॅ.आबासाहेब रणदिवे, तानाजी सालविठ्ठल, अविनाश नागटिळक, अनंता चव्हाण, अजित मुलाणी, संजय लोखंडे, तुगंत सबडिव्हीजनचे पोतदार, प्रा.शरद चव्हाण, तानाजी रणदिवे, संचालक विठ्ठल रणदिवे, नितीन सालविठ्ठल, शिवाजी शिनगारे, बाळासाहेब सालविठ्ठल, शंकर सुर्वे, तानाजी नागटिळक बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments