काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये ऊस दरा मध्ये १५० रूपयाची वाढ करण्यात आली या निर्णयामुळे सुमारे पाच कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी चळवळीतील लोकांची मागणी होती की एफआरपीमध्ये वाढ करावी परंतु काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी एफ आर पी मध्ये वाढ करत 3550 रुपये देण्याचा निर्णय घेतला उसाचा दर वाढल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी हिताचे काम करणाऱ्या केंद्र सरकार चे अभिनंदन करत पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नामदेव पायरी जवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे युवक नेते प्रणव परिचारक भाजप किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख करकबं मंडलाध्यक्ष हर्षद कदम विकास वाघमारे सुदर्शन यादव प्रमोद नाईक नवरे धनाजी डुबल भास्कर कसगावडे आबा पवार अक्षय वाडकर विजय मोरे .. यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments