पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ‘एम्पॉवरिंग ट्रेंड इन सोलार एनर्जी: पॉलिसीज्, सबसिडीज् अँड बिझनेस अपॉर्च्युनिटीज्’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये ‘सोलार एनर्जी’ व वाढती ‘इलेक्ट्रीकल वाहने’ यावर चर्चा करण्यात आली.
‘सौर ऊर्जेतील बदलत्या प्रवाहावर प्रकाश टाकणे’ हाच या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. भारतात व जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या धोरणामध्ये, अनुदानामध्ये आणि उद्योजक व अभियंत्यासाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी बाबत विचारमंथन करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलार इलेक्ट्रॉनिक्स, पुण्याचे व्यवस्थापकीय संचालक एस.डी. बांदल हे लाभले होते. स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे एस. डी. बांदल यांनी सौर ऊर्जा क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ.बादलकुमार यांनी कार्यशाळा आयोजिन्याचा हेतू स्पष्ट केला. उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी स्वेरीच्या शैक्षणिक वाटचाली संबंधी सांगितले. या कार्यशाळेप्रसंगी 'स्वेरी' आणि 'सोलार इलेक्ट्रॉनिक्स, पुणे' यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. हा औपचारिक सामंजस्य करार करण्याचा उद्देश म्हणजे ‘शैक्षणिक क्षेत्र’ आणि ‘उद्योजक’ यामधील अंतर कमी करणे हा आहे. या नियमित चालणाऱ्या परस्पर संवादामुळे संस्थेला उद्योगातील तज्ञांकडून कौशल्ये व क्षमता याबाबत मौल्यवान मार्गदर्शन लाभणार आहे. कंपनीच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशीप, कार्यशाळा आणि अप्रत्यक्ष अनुभव यावर आधारित क्षेत्राला चालना मिळणार आहे. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ‘तांत्रिक सॉफ्ट स्किल’ प्रशिक्षण मिळणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. एस. डी. बांदल यांनी ‘तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी मौल्यवान सूचना दिल्या. त्यांनी अभ्यासक्रम आणि औद्योगिक प्रगती तसेच उद्योग तंत्रज्ञान या बाबत सुसंगती असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात ‘सौरऊर्जेचे वाढते महत्त्व सांगून सध्या इलेक्ट्रिकल वाहने वाढत असून या क्षेत्रातील वाढती व्याप्ती व परिवर्तन यावर प्रकाश टाकून 'ऊर्जा क्षेत्रात होणारे सकारात्मक परिवर्तन आणि शाश्वत विकासासाठी उपलब्ध संधी' यावर प्रकाश टाकला. यावेळी सोबत इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ. डी. ए. तंबोळी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.बादलकुमार व इतर प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये २४७ विद्यार्थी व ४७ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस. एस. कवडे यांनी काम पाहिले. प्रा. आर. एन. खांडेभराड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
0 Comments