पंढरपुर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारी विविध कागदपत्रे काढण्यासाठी पंढरपुरात विद्यार्थी व पालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही गैरसोय होत असल्याने संबंधित कार्यालयात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी पंंढरपूर येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
नुकताच इयत्ता बारावी व दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वगैरे बरेच कागदपत्रे लागतात. परंतु कांहीं पालक अशिक्षित असल्याने वेळीच कागदपत्रे काढून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे कागदपत्रे काढणे कामी अचानक आता पंंढरपूर तहसिल मधील सेतु कार्यालयात गर्दी वाढत आहे.
अशातच यावर्षी शासनाच्या शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतल्याने व त्यासाठी जातीचा दाखला, नॉन क्रेमि्लेअर, ई डब्लू एस हे दाखले जोडणे आवश्यक केले असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ होणार आहे.
तरी यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी ऑफिस मध्ये वाढीव कर्मचारी नेमून दाखले वेळेत देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पंंढरपूर येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
.............
मा. संपादक, पत्रकार साहेब सप्रेम नमस्कार.
कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय, दैनिक, साप्ताहिक, न्यूज चॅनल, युट्यूब न्यूज चॅनल व वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून सहकार्य करावे.
आपला विश्वासू
गणेश अंकुशराव
+91 93702 71730
0 Comments