दिनांक, ०३ मे २०२५
जातनिहाय जनगणना करण्याची सरकारने घोषणा केली. जातनिहाय जनगणना ही काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या सातत्यपुर्ण मागणीचे फलित आहे. त्यामुळे सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे डिझिटल फलक लावून शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिसकी जितनी संख्या भारी - उसकी उतनी भागीदारी, राहुलजी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, राहुलजी गांधी झिंदाबाद, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अश्या घोषणाबाजी करत राहुलजी गांधी यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, देशभरात जातनिहाय जनगणना करावी, यासाठी देशात सामाजिक न्यायासाठी सातत्याने आग्रही असलेले आमचे नेते राहुल गांधी यांनी मुद्दा लावून धरला होता. त्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. या अगोदर राहुलजी गांधी कृषी कायदे, लॉकडाऊन चे परिणाम, अग्निवीर योजना, चुकीच्या पद्धतीने राबविलेली GST चे धोरणांचे देशावर दुष्परिणाम होणार हे आधीच सांगितले होते. त्यामुळे सरकारला अनेक निर्णयात बदल करावा लागला. जातनिहाय जनगणना विषयी सुद्धा राहुलजी गांधी यांच्या मागणीचा भाजप नेत्यांनी मंत्र्यांनी विरोध केला होता. भाजप मंत्री अनुराग ठाकूर यांनी भर संसदेत राहुलजी गांधी यांची जात कोणती हेही विचारण्यात आली होती. पण राहुलजी गांधी सत्य बोलत असल्यामुळे यांच्या दबावाने केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याने हे राहुल गांधी यांच्या मागणीला आलेले यश आहे. यामुळे मागासवर्गीय घटकांची नेमकी लोकसंख्या आणि त्यांची स्थिती समोर येणार असल्याने त्यांचा सर्वांगिण विकास करणे शक्य होईल. मात्र मोदींच्या इतर आश्वासनाप्रमाणे हा मुद्दा केवळ निवडणुकीपूरता जुमला ठरू नये ही अपेक्षा. जातनिहाय जनगणनेची सातत्याने मागणी करणाऱ्या राहुलजी गांधी यांचे आभार
यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मा. नगरसेवक विनोद भोसले, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, लखन गायकवाड, सागर उबाळे, नागेश म्हेत्रे, संजय गायकवाड, पंडित सातपूते, गिरिधर थोरात, विवेक. कन्ना, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, नूर अहमद नालवार, परशुराम सातारेवाले, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, शाहू सलगर, श्रीकांत दासरी, सौरभ साळुंखे, अप्पा सलगर, सचिन सुरवसे, चंद्रकांत आव्हाड, विनोद रणसुरे, सूर्यकांत व्हनकडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments