LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणिती शिंदे यांचा पाकणी गाव भेट दौरा संपन्न*


सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी समस्या बाबत चर्चा करून काही समस्या जागेवरच सोडवल्या. तर काही समस्येबाबत पाठपुरावा करू असे सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार झाले त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता मी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन जनतेच्या समस्या ऐकून घेऊन ते माझ्या परीने सोडण्याचा प्रयत्न करत आहे. 

यावेळी पाकणी ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन व विकास निधीची मागणी याप्रसंगी केली.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव, सरपंच बालाजी येलगुंडे, महिला तालुका अध्यक्ष प्रणिता शिंदे, श्रीकांत येलगुंडे, सचिन ढेपे, दत्ता सुरवसकर, सुनील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शरद चंदनशिवे, सदाशिव सलगर, श्री ढेपे सर, सचिन गुंड, विकास राठोड आदी उपस्थित होते.
 ▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments