पंढरपूर,आज रोजी स्वराज्य भूषण शिवबा काशीद जन्मोत्सव सोहळा निमित्ताने स्वराज्य भूषण शिवबा काशीद चौकाचे नामकरण संपादक प्रमोद भोसले तर, पत्रकार प्रशांत वाघमारे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देवकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष महादेव शिंदे, सोमनाथ खंडागळे, समाजसेवक बाबा चव्हाण, मनोज गावठे, युवराज हडपद, पिंटू शेटे, सतिश चव्हाण, महेश माने, अनिल शेटे, तुकाराम चव्हाण, चंद्रकांत खंडागळे, आदि मान्यवर उपस्थित होते.तसेच नाभिक समाजातील बहुसंख्य युवक उपस्थित होते.
0 Comments