मंगळवेढा :
कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करतांना, महाराष्ट्र अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 व नियम 2003 मध्ये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करतांना सक्षम अधिकाऱ्यासाठी कार्यपध्दतीनिश्चित केली आहे. त्या कार्यपद्धतीला मंगवेढयाचे प्रांताधिकारी बी आर माळी यांनी हरताळ फासला असुन कोळी महादेव जमातीच्या अर्जदारास संविधानिक हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप सकल कोळी महादेव, मल्हार टोकरे,ढोर,कोळी जमातीचे अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे .
महाराष्ट्रअधिनियम2000 व नियम2003 मध्ये कलम 3 नुसार खंड [क]ते [च ] मध्ये उल्लेखिलेला कोणताही एक पुरावा द्यावा अथवा मानिवदिनांकापुर्वीचा पुरावा असेल तर द्यावा नसेल रहिवासी पुरावा द्यावा असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्याप्रमाणे अर्जदाराने रहिवासी पुरावा जोडला आहे.
कलम 4 नुसार अर्जदार खंड [ क] ते [च] मध्ये उल्लेखिलेला कोणताही एक किंवा अनेक दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी अर्जदार त्याबाबतची कारणे आपल्या शपथपत्रात नमूद करेल आणि सक्षम प्राधिकार्यास त्यावर विचार करता येईल. त्यास योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानं.तर दाव्याचा निर्णय देईल असे नमूद केले आहे.
वरील अधिनियम 2000 व नियम 2003 नुसार खंड [क ] ते[ च] मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदार अरविंद नाईकवाडी यांनी पुरावे सादर केले आहेत. तसेच कलम 4. नुसार अर्जदारांने शपथपत्रही सादर केलेले आहे. अर्जदारास सुनावणीस बोलवले होते त्यावेळी त्यांच्या सर्व शंका दुर केल्या होत्या. सर्कल चौकशी अहवालही अर्जदाराच्या बाजूने असतांना प्रांताधिकारी बी आर माळी यांनी कायद्यातील तरतुदींना हरताळ फासला असून अनुसूचित जमातीच्या एका अतिसामान्य अर्जदारास त्यांच्या मूलभूत हक्कापासून व सामाजिक व संविधानिक आरक्षणापासून वंचित ठेवून जात प्रमाणपत्र पडताळणी पुणे यांच्या अपिलात जाण्याचा सल्ला देऊन माझी सक्षम अधिकारी म्हणून नेमणुक असली तरी मी अनुजमातीच्या उमेद्वाराचा निर्णय घेण्यास असक्षम आसल्याचे दाखवून दिले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद साहेब व पंढरपुर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी लक्ष घालावे अर्जदारास न्याय द्यावा अशी मागणी कोळी महादेव समाजातुन होत आहे.
0 Comments