पंढरपूर- ‘संत विचारपीठ, पंढरपूर व परमपूज्य साने गुरुजी स्मारक समिती, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर मध्ये ‘समता वारी २०२५’ या ‘समता संस्कार शिबिरा’चे आयोजन केले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा.’ असे आवाहन संत विचारपीठ पंढरपूर व परमपूज्य साने गुरुजी स्मारक समिती, पंढरपूर यांच्या वतीने कळविले आहे.
येत्या शुक्रवारी दि.९ मे व शनिवारी, दि. १० मे २०२५ या दोन दिवशी ‘समता वारी संस्कार शिबिरा’चे आयोजन केले आहे. यामध्ये गुरुवार,दि. ८ मे २०२५ रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मंगळवेढ्यातील श्री. संत चोखामेळा समाधी स्थळ या ठिकाणी भजन व श्री. संत चोखामेळा यांची अभंगवाणी, गाथा तसेच श्री. संत दामाजीपंत यांच्या स्मारकापर्यंत दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे. शुक्रवार, दि.९ मे २०२५ रोजी सायं. पाच ते आठ वाजेपर्यंत पंढरपूर मधील जुना कासेगाव रोड लगत असलेल्या ‘लोटस इंग्लिश स्कूल’ मध्ये ‘सामाजिक वास्तव आणि प.पू.साने गुरुजी यांच्या स्वप्नातील भारत’ परिसंवादात्मक चिंतन क्र,१ चे आयोजन केले आहे. यामध्ये इस्लामपूर येथील डॉ. श्यामसुंदर मिरजकर व घेरडी (ता.सांगोला) मधील ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचा सहभाग असणार आहे. यासाठी अध्यक्षस्थान मिरजचे राष्ट्रसेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते सदाभाऊ मगदूम हे भूषवणार आहेत. दि.१० मे २०२५ रोजी सकाळी सात ते ८.३० पर्यंत पंढरपूर मधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज पायरी व श्री.संत चोखामेळा समाधीस्थळ येथे भजन, प्रार्थना, व श्री संत चोखामुळे यांच्या श्री. विठ्ठल दर्शनाचा सांकेतिक सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वा. श्री. विठ्ठल मंदिर ते श्री. संत कैकाडी महाराज मठ पंढरपूर पर्यंत पदयात्रा (वाटचाल) काढण्यात काढण्यात येणार आहे. त्यानंतर स. ९.३० वा. श्री संत कैकाडी महाराज मठ, पंढरपूर मध्ये श्री. संत विचारपीठ पंढरपूर यांच्या वतीने २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या ‘संत साहित्या’वरील निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम, तसेच ‘संत साहित्य आणि सामाजिक वास्तव’ या विषयावर परीसंवादात्मक चिंतन क्र.२ चे आयोजन केले असून यामध्ये सांगोल्याचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले व परळीचे ह.भ.प. डॉ. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचा सहभाग असणार आहे. याचे अध्यक्षस्थान ह.भ.प.भारत जाधव महाराज पंढरपूर हे भूषवणार आहेत. दुपारी १ वा. तीर्थप्रसाद व विसर्जन होणार आहे. तरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या ‘समता वारी संस्कार शिबिरा’स उपस्थित राहण्याचे आवाहन प.पू.साने गुरुजी स्मारक समिती, पंढरपूर व संत विचारपीठ, पंढरपूर यांच्या वतीने केले आहे. या समता वारी २०२५ च्या ‘समता संस्कार शिबिरा’च्या अधिक माहितीसाठी ह. भ. प. भारत जाधव महाराज (९०११०९७९७९), दादासाहेब रोंगे (मोबा.क्र.७३५०१३३०००), ह.भ.प.अनंत तनपुरे महाराज (९९६०३६३७७७), शिवाजीराव शिंदे (९०११०९५७११), ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर महाराज (८४५९२१२०२५), सारंग कोष्टी (९०९६९१३८४९) राजाभाऊ अवसक (९०२८२२१७१७) व निशिकांत प्रचंडराव (९९६०३०५२५२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे,
0 Comments