पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने शनिवार, दि.२५ एप्रिल २०२५ रोजी ‘सिव्हिकॉन २.०’ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या या स्पर्धात्मक उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व विभागप्रमुख डॉ. एस. पी. पाटील यांच्या सहकार्याने ‘सेसा’ तथा ‘सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडन्ट असोसिएशन’, आय. जी. एस. पुणे चॅप्टर, स्टार्टअप स्पार्क क्लब आणि आय.आय.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उदघाटन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या हस्ते व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ‘सिव्हिकॉन २.०’ या तांत्रिक स्पर्धेमध्ये जिओ बजर, सॉईल आर्ट, क्लोन लॉजिक, थिंक टँक अशा तांत्रिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ म्हणाले की, ‘थिंक टँक’सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना आणि नवकल्पनांना बळकटी मिळणार आहे. उद्योजकतेबद्दलची जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. स्वयंपूर्ण उद्योजक बनण्याची प्रेरणाही त्यांना या कार्यक्रमातून मिळणार आहे. त्यामुळे अशा स्पर्धात्मक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. यामुळे भविष्यात आपल्या तांत्रिक वाटचालीस नवी दिशा देखील मिळणार आहे.’ यावेळी सिव्हील इंजिनिअरिंग विभागात सर्वत्र स्पर्धात्मक वातावरण दिसून येत होते. सर्व भिंतीवर बांधकामाच्या विविध कलाकृती, आकर्षक सजावट केल्याचे दिसून आले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्रे देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धक विद्यार्थ्यांनी मातीकामातून मंदिराच्या बांधकामाचे, कळसाचे, ग्रामीण भागातील पूर्वीचे भक्कम बांधकाम असलेल्या वास्तूच्या विविध कलाकृती मातीकामातून बनवल्या होत्या. या कलाकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, विभागप्रमुख डॉ. एस. पी. पाटील व प्रा. पूजा रोंगे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. पी. एच. गुंड यांनी काम पाहिले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एम. व्ही. डोंगरे व सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक तसेच सजल वाघमारे, संचित झुंजकर, भूषण बागल, उदयराज आव्हाड, तेजस सुडके आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. एकूणच सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे विविध नमुने सादर केले होते.
0 Comments