आषाढी यात्रा आठ दिवसांवर आहे. या अनुषंगाने पुढील दिवसात होणाऱ्या गर्दीचा विचार करून या काळात भाविकांना तात्काळ दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. पुढील वीस दिवस म्हणजे १६ जुलैपर्यंत मंदिर २४ तास खुले राहणार आहे.
आज सकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत देवाचा पलंग काढण्यात आला. त्यानंतर देवाला लोड देण्यात आला. आज पाहिले विठुरायाचे विधीवत पूजा केल्यानंतर भाविकांसाठी २४ तास दर्शन सुरू झाले.
या काळात नित्योपचार वगळता विठोबाचे सर्व राजोपचार बंद ठेवले जातात.
यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदिरे समितीचे सदस्य ॲड. माधवी ताई निगडे, शकुंतला ताई नडगिरे, उपस्थित होते.
0 Comments