सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौरा दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. गाव भेट दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामस्थांची निवेदने स्वीकारली आणि समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले आणि मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे वचन दिले. तसेच
*येत्या लोकसभा अधिवेशनात माळढोक अभयारण्याबद्दल, आणि पंतप्रधान हर घर नळ योजना, तसेच शेतकऱ्यांचे तसेच प्रश्न मांडुन ते मार्गी लावणार.*
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष भारत जाधव ,तालुकाध्यक्ष शिवसेना (उध्दव ठाकरे गट) संजय पौळ, काँग्रेस नेते सुदर्शन अवताडे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सचिन गुंड, हनुमंत जावीर, सुमित शिंदे, मा. सरपंच तुकाराम चव्हाण, उपसरपंच सौ. ज्योती भोरे,ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री शिराळ, सौ. दिव्या कोकरे, सौ. जयश्री कांबळे, माजी सरपंच दत्ता पवार, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास गायकवाड, शालेय समिती सदस्य ज्ञानेश्वर काशिद, आनंद इंगळे, राहुल सुरवसे, प्रशांत जगताप, भागवत कत्ते,मल्लिनाथ तंबाके, काशिनाथ माने, प्रविण होळकर, गुल्लसाहेब शेख,नागनाथ पाटील शिवाजी माने, सचिन माने, चंद्रकांत मस्के, बाबु तंबाके, विजय बहिर्जे, शहाजी गिरे, सचिन गिरे, कालिदास कांबळे, समीर पठाण, सचिन आदाटे, साईनाथ शिराळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments