🟣👉 सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर तालुक्याचा दौरा करून ६५ एकर वारकरी निवास व्यवस्था, चंद्रभागा नदी व वाळवंट, श्री. विठ्ठल दर्शन रांग व्यवस्था, वाखरी पालखी तळ, उपजिल्हा रुग्णालय यासह इतर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांग, पालखी मार्गावर, तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शौचालय, अखंडित वीजपुरवठा, टँकर, आपत्कालीन केंद्रे, नदीपात्राची स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पूरजन्य परिस्थिती यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच वारी कालावधीत प्रत्येक विभागाला देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी, अशा सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्या.
यावेळी संदीप पाटील, किरण घाडगे, अमर सुर्यांवंशी, प्रशांत शिंदे, सतीश शिंदे, संग्राम गायकवाड, संदीप शिंदे, समीर कोळी, मिलींद अढवळकर, नागेश गंगेकर, मामा फलटणकर, राजू उराडे, बाळू आसबे, व्यंकटेश कुलकर्णी, धनंजय काकडे, देवानंद इरकल, दत्तात्रय बडवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments