प्रथम वर्ष एम.टेक. प्रवेश प्रक्रियेच्या कॅप रजिस्ट्रेशनला मुदतवाढ
स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूरः 'अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक.च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया मंगळवार, दि.०१ जुलै २०२५ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला एम.टेक. स्क्रुटीनिटी सेंटर (एस.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया गुरुवार, दि. ०९ जुलै २०२५ (सायं. ५.००) पर्यंत होती परंतु या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे मिळाली नाहीत त्यामुळे अनेक विद्यार्थी हे नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्य्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून बुधवार, दि. १६ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने एम.टेक. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार, दि.०१ जुलै २०२५ पासून ते बुधवार, दि. १६ जुलै २०२५ (सायं. ५.००) वाजेपर्यंत ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालणार आहे तसेच कागदपत्रांची पडताळणी व निश्चिती (कन्फर्मेशन) करण्यासाठी बुधवार, दि.०२ जुलै २०२५ पासून ते गुरुवार, दि.१७ जुलै २०२५ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे त्या इच्छुक विद्यार्थ्यांनी बी.टेक. पदवीचे शिक्षण घेतलेले असावे, गेट २०२५ मध्ये नॉन झिरो स्कोर असावा किंवा एखाद्या कंपनीत कमीत कमी २ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. असे पात्र विद्यार्थी एम.टेक.मध्ये प्रवेश घेऊ शकतात. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध आहे. एम.टेक.च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील (मोबा. नंबर–९५९५९२११५४) व डॉ. सचिन खोमणे ( मोबा.नं.- ९०४९३४९४२९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments