पंढरपूर/प्रतिनिधी
गोपाळपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण लेंगरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली.
यामध्ये कमलाक्षी अतुल गुरव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते, पांडुरंग कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी आसबे, पोलीस पाटील विजय पाटील, सरपंच पुष्पाताई बनसोड, ग्रामविकास अधिकारी ज्योतीताई पाटील, माजी सरपंच विलास मस्के, सोसायटीचे चेअरमन गोविंद लेंगरे, माजी उपसरपंच विक्रम आसबे, उदय पवार, बाळासाहेब आसबे, माजी सरपंच उज्वलाताई बनसोडे, सविता आसबे, मनीषा आसबे, गोदाबाई सूर्यवंशी, सीमा म्हेत्रे, पांडुरंग देवमारे, इकबाल कांबळे, दीपक सूर्यवंशी, राहुल माने, सचिन आसबे, विठ्ठल लेंगरे, बबन शिरगिरे, रघुनाथ पवार, लक्ष्मण मस्के, प्रशांत जाधव, रवींद्र गुरव भूषण माने, प्रताप पाटील, माऊली गवळी, योगेश पवार समस्त ग्रामस्थ गोपाळपूर व गुरव परिवार उपस्थित होते.
याचे सूत्रसंचालन भाजपा उपाध्यक्ष दत्तात्रय (गुंडू) गुरव यांनी केले तर आभार उद्धव गुरव यांनी मानले.

0 Comments