LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीज् डी.फार्मसीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायमप्रथम वर्षात समृद्धी दीक्षित प्रथम तर द्वितीय वर्षात अर्चना वाघ प्रथम

 

पंढरपूरः  गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल अलीकडेच घोषित झाला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस. बी. टी.ई.) ने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी.फार्मसी (पॉलि.) च्या समृद्धी दीक्षित यांनी प्रथम वर्ष डी.फार्मसीमध्ये तर अर्चना वाघ यांनी द्वितीय वर्ष डी. फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. 
          पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीच्या शिक्षणासाठी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर अशा मोठया शहरात जावे लागत होते. विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय पाहून व त्याचबरोबर संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या फार्मसीकरीता केलेल्या  मागणीच्या पार्श्वभूमीवर डी.फार्मसी कॉलेजची स्थापना केली. डी. फार्मसीचे यंदाचे हे १९ वे वर्ष आहे. डी. फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक निकालात यशाची परंपरा कायम राखल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक समृद्धी सतीश दीक्षित (८७.२० टक्के), द्वितीय क्रमांक शोभा सुरेश  मासाळ (८४.२० टक्के), तृतीय क्रमांक प्रतिभा दिलीप मिसाळ (८३.१० टक्के) यांनी मिळविला. तर द्वितीय वर्ष डिप्लोमा फार्मसीमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक अर्चना महादेव वाघ (८६.६४ टक्के), द्वितीय क्रमांक प्रणिता सुरेश खरात (८६.१८ टक्के), तृतीय क्रमांक धनाली अनिल  बरकडे (८५.९१ टक्के) यांनी मिळवला. दोन्ही वर्षांतील यशस्वी विद्यार्थ्याना प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले,  उपाध्यक्ष सुरेश राऊत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments