पंढरपूर दि.23 - मध्य रेल्वेचे उप महाव्यवस्थापक श्री.प्रतिक गोस्वामी हे आज पंढरपूर रेल्वे स्टेशनची पहाणी करण्यासाठी आले असता व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली.
पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून दुपारी 2-30 नंतर मिरज ला जाण्या साठी एकही ट्रेन नाही, रात्री 9 ची मिरज गाडी बंद केली आहे,आठवड्यातून 3 दिवस असणारी पंढरपूर- शिर्डी साईनगर ही ट्रेन देखील बंद करण्यात आली असल्याचे श्री.गोस्वामी यांच्या निदर्शनास आणून दिले,प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद असतानाही या ट्रेन बंद केल्याचे सांगून पंढरपूर- मुंबई ही आठवड्यातून 3 दिवस चालणारी ट्रेन पुर्ण सात दिवस चालवावी,तसेच नविन सकाळी पंढरपूर- पुणे ही ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.
तसेच पंढरपूर रेल्वे स्टेशनवर वारकरी भाविकांसाठी फ्रुट स्टाॅल(विविध फळे),व विश्राम गृह सुरू करण्याची मागणी केली,या मागण्यांची नोंद घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले,यावेळी जिल्हा प्रबंधक जोशी, वाणिज्य व्यवस्थापक पाटील,पंढरपूर रेल्वे स्टेशन मास्तर कुशाल कुमार मिश्रा इत्यादी रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments