पंढरपूर प्रतिनिधी दि.23- पंढरपूर शहारात झालेल्या जगताप कुटुंबातील दुहेरी हत्यांकांडातील आरोपींचा जलदगतीने तपास होवून जगताप कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली.
पंढरपूर शहरात मागील आठ दिवसापुर्वी श्री.संजय दादाराव जगताप यांची पत्नी सौ. सुरेखा संजय जगताप व मुलगा चि.लखन संजय जगताप या दोघांचा निर्घुनपणे खुन झालेला आहे. या दुहेरी हत्याकांड मुळे श्री.जगताप कुटुंब पुर्णत: दहशती खाली वावरत असून त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. सदर घटनेला आठ दिवस झाले तरीही मारेकरी यांचा तपास लागलेला नाही त्यामुळे ते न्यायाची अपेक्षा करीत आहेत. तरी श्री.जगताप यांच्या कुटुंबातील झालेल्या दुहेरी हत्यांकांडातील आरोपींचा जलदगतीने तपास होवून श्री.जगताप कुटुंबाला न्याय मिळावी अशी विनंती काळे यांनी केली आहे.
.
0 Comments