LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरु - चेतनभाऊ नरोटे यांची माहिती*👉 *सर्व प्रभागात नियोजनबद्ध तयारी सुरू करा समिती सदस्यांना आवाहन*



देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी "मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती" सदस्यांची महत्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती.

          यावेळी संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क, प्रभागरचना, भाजप महायुती सरकारचे अपयश, आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे याबाबत समिती सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले.

           सोलापूर शहर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुशील बंदपट्टे, उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

          यावेळी शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की, भाजपाला सत्तेचे विकेंद्रीकरण आवडत नाही. म्हणून ते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत. जवळपास गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रखडलेल्या आहेत शेवटी न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका होणार आहेत. राज्यात भाजप महायुती सरकारमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी प्रचंड भ्रष्टाचार, बाष्फळ बडबड, दडपशाही, महिला अत्याचार प्रकरणे प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे भाजपबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपने अंधाधुंदी कारभार केला. आपल्या सर्वांना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांनी आता नियोजनबद्ध कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे. युती करायची की नाही, याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महानगरपालिकेत पदाधिकारी नसल्यामुळे महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि शहराची दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, महानगरपालिकेवर तिरंगा फडकविण्यासाठी बैठका, बूथ वॉर्डनिहाय यंत्रणा, प्रभागनिहाय नियोजन आणि थेट लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर द्यावा. जातीवाद आणि धार्मिकतेच्या नावाखाली मतविभागणी केली जात असून, या विघातक प्रवृत्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची तयारी ठेवावी, यासाठी प्रत्येक प्रभागात नियोजन सुरू करा असे आवाहन समिती सदस्यांना केले.

     या बैठकीस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, ज्येष्ठ नेते महादेव अण्णा चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलकाताई राठोड, सुशीलाताई आबुटे, मा. नगरसेवक रियाज हुंडेकरी, शिवा बाटलीवाला, प्रवीण निकाळजे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, म. प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, हणमंतू सायबोलू, सुशील बंदपट्टे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, मध्य युवक अध्यक्ष वाहिद विजापूरे, अनुसूचित जाती अध्यक्ष उमेश सरते, झोपडपट्टी सेल अध्यक्ष बसवराज म्हेत्रे, शिक्षक सेल अध्यक्ष सुबोध सुतकर, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, लक्ष्मीकांत साका, प्रदेश चिटणीस शकील मौलवी, सुभाष चव्हाण, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, रामसिंग आंबेवाले, शफी हुंडेकरी, मैनुद्दीन शेख, सुमन जाधव, धोंडप्पा तोरनगी, एजाज बागवान, संघमित्रा चौधरी, लखन गायकवाड, गिरिधर थोरात, कोमोरो सय्यद, रुस्तुम कंपली यांच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
*तिरुपती परकीपंडला (tp)*
सोलापूर शहर काँग्रेस मिडिया सेल 
माझा नवीन व्हॉट्सॲप नंबर *8010505458* आपण सेव करून आपल्या व इतर ग्रुप मध्ये अँड करावा.

Post a Comment

0 Comments