LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उद्योजकतेत यशाची घोडदौड करत समाज परिवर्तनाचा वसा घेणाऱ्या तरुणाचा गौरव


परिते येथील तरुण आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री शुभम कोकीळ यांना ए.डी. फाउंडेशनतर्फे "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श युवा उद्योजक पुरस्कार 2025" जाहीर झाला आहे. कमी वयात स्वतंत्र व्यवसाय साम्राज्य निर्माण करून समाजोपयोगी उपक्रमांतून ठसा उमटवणाऱ्या कोकीळ यांची ही गौरवास्पद निवड झाली आहे.

२०१८ मध्ये त्यांनी हर्षदा ग्रीन प्लॅनेट अंतर्गत हर्षदा अग्रोटेक या कंपनीची यशस्वी सुरुवात केली. पुढे २०१९ मध्ये विद्यार्थ्यांसाठी शिस्तप्रिय विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्षपद स्वीकारून अनेकांना दिशा दिली. २०२२ मध्ये राज्य परिवहन (एसटी) सेवेच्या आधुनिकीकरणासाठी जीपीएस प्रणालीचा अभिनव प्रकल्प सादर करून प्रवाशांची वाट पाहण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. या प्रणालीमुळे एसटी कुठे आहे व ती स्थानकात कधी पोहोचेल याची अचूक माहिती मिळणे शक्य झाले.

२०२४ मध्ये त्यांनी Harshada Chemicals Industries ची स्थापना करून फिनाइल, हँडवॉशसह १२ उत्पादने विकसित केली. पुणे, मराठवाडा आणि विदर्भामध्ये या प्रॉडक्ट्सना मोठी मागणी मिळत आहे.

शुभम कोकीळ यांचे ध्येय केवळ स्वतःची प्रगती न करता इतरांना साथ देत व्यवसायाच्या नव्या वाटा निर्माण करणे हे असून, ते सातत्याने नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत आहेत.

त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना रेड क्रॉस सोसायटी युवा वक्तृत्व पुरस्कार, रयत युथ पुरस्कार, आणि भारतीय जैन संघटना युवा वक्तृत्व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते एक प्रसिद्ध व्याख्यानकार असून, आजच्या तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

Post a Comment

0 Comments