समाजकल्याण कार्यालय जातपडतातळणी समिती कडे सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढाव्यात या मागणीसाठी समाजकल्याण भवन सात रस्ता सोलापूर येथील जातपडताळणी समितीचे अध्यक्ष मंजुषा मिसकर यांना निवेदन दिले.
यानिवेदाद्वारे सोलापूर शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जात प्रमाणपत्र आणि त्याची पडताळणी प्रक्रिया. अनेक विद्यार्थी मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय घटकातून येतात आणि त्यांना शासकीय आरक्षण, शिष्यवृत्ती, फी सवलत, शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षित जागा यासाठी जातप्रमाणपत्र अनिवार्य आहे.
मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची जातपडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, पुढील प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती यावर थेट परिणाम होत आहे. विविध कारणामुळे विद्यार्थ्यांचे जातपडताळणी होण्यास विलंब होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकांना प्रवेशाची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपली आहे, पण जातप्रमाणपत्र न मिळाल्यामुळे ते प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याच्या भीतीत आहेत. त्यामुळे, आमच्या वतीने खालील मागण्या तातडीने मान्य कराव्यात:
१) प्रलंबित सर्व जातपडताळणी प्रकरणांचे निकालीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी.
२) शाळा, महाविद्यालय स्तरावरच आवश्यक कागदपत्रे गोळा करून एक खिडकी योजना राबवावी.
३) विद्यार्थ्यांना आधार क्रमांक व प्राथमिक प्रमाणपत्रावर तात्पुरता प्रवेश देण्याचा आदेश द्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित ठेवणे हे शासनाचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे. लहानशा तांत्रिक त्रुटींमुळे कुणाचेही भविष्य अंधारात जाऊ नये, हीच नम्र विनंती. आम्ही संबंधित विभाग, व जात पडताळणी समिती यांना निवेदनाद्वारे विनंती करतो की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे निर्णय तातडीने घ्यावेत आणि गरजू पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा यावेळी उपस्थित संजय गायकवाड सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, नागेश मायकल, सुभाष वाघमारे, अंकुश बनसोडे, व्यंकटेश बोमेन, आनंद संभारंभ, हे उपस्थित होते..

0 Comments