पंंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात चक्क पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष
समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी उघडकीस आणली असून यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असुन देवाच्या मंदिरातच असे घाणेरडे कृत्य करणारांचा शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
नुकतेच गणेश अंकुशराव हे श्री विठ्ठल मंदिरात गेलेले असताना भाविक देवाचे मुखदर्शन घेऊन बाहेर पडतात त्या दरवाज्यासमोरच श्री रूक्मिणी मातेच्या समोरील बाजुस कोपऱ्यात धुम्रपान करून थुंकल्याचे निदर्शनास आले. याठिकाणचे व्हिडिओ आणि छायाचित्रे ही गणेश अंकुशराव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
लाखो वारकरी भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या आमच्या आराध्य दैवताच्या मंदिराची इथे अशा प्रकारे विटंबना होत असताना, मंदिराच्या पावित्र्याला गालबोट लागत असताना मंदिर समिती सदस्य, मंदिर समितीचे अधिकारी काय करत आहेत? काय झाले दहा लाखांच्या स्वच्छतेच्या ठेक्याचे ? असा खडा सवाल गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.
सदर ठिकाणी शंभर टक्के येथील मंदिर समितीचे कर्मचारी च अशा प्रकारे धुम्रपान करून थुंकत असणार!! असा दाट संशय असल्याचंही गणेश अंकुशराव म्हणालेत.
जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष घालून
सदर प्रकाराची तातडीने चौकशी होऊन असे किळसवाणे गैरकृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
दरम्यान मंदिरातील हा प्रकार समोर आल्यानंतर वारकरी भावीकांमधूनही संताप व्यक्त होत आहे.
.....................
...................
मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
आपला
गणेश अंकुशराव
मोबाईल: +91 93702 71730
0 Comments