पंढरपूरः ‘स्वातंत्र्यापूर्वी झालेला संघर्ष आणि स्वातंत्र्यानंतर भारताची होत असलेली प्रगती पाहता युवकांमध्ये आज राष्ट्रप्रेम जागृत होत आहे. आजचा भारत हा परिश्रम करून यशाची एक एक शिखरे गाठत आहे त्यामुळे भारत देश आज जगाच्या नकाशावर आकर्षिला जात आहे. या यशामागे देशप्रेमाची भावना आहे.’ असे प्रतिपादन अभियांत्रिकीची विद्यार्थिनी साक्षी कदम यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अभियांत्रिकीची विद्यार्थिनी साक्षी कदम ह्या भारतीय स्वातंत्र्यावर अभ्यासपूर्ण भाष्य करत होत्या. यावेळी मुळचे गादेगाव (ता. पंढरपूर) चे असणारे व सध्या अहमदनगरला स्थायिक असलेले,भारतीय सेना दलात विविध राज्यात सेवा बजावलेले आणि तब्बल तीन राष्ट्रपती पारितोषिक विजेते कॅप्टन बी.के.बागल यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. सोनाली कांबळे, स्नेहा मोरे, धैर्यशील पवार, ऋतुजा चव्हाण, पियुष चोपडे, नेहा झिरपे व संस्कार भालेराव यांनी भारताची कालची व आजची परिस्थिती सांगून स्वातंत्र्यानंतर भारताची स्थिती यावर इंग्रजी भाषेतून आपले विचार अभ्यासपूर्ण भाषणातून मांडले. स्नेहल चव्हाण यांनी सुमधुर चालीत ‘दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिये...’ हे ‘कर्मा’ चित्रपटातील गीत गायले. कॅप्टन बी.के.बागल यांनी स्वातंत्र्यापूर्वीची स्थिती व स्वातंत्र्यानंतरची प्रगती यावर प्रकाश टाकला. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांतील विविध विभागांच्या न्यूज बुलेटीन्सचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रगती पवार, सृष्टी काळे, नेहा झिरपे, साई मोरे, चैतन्य सोनवणे, समर्थ कुलकर्णी, अंजली पवार, नम्रता घुले यांचा आंतरविद्यापीठ स्तरीय क्रीडा क्षेत्रात यशस्वी कामगिरी केल्याबद्धल पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, सचिव प्रा. सुरज रोंगे, विश्वस्त एच. एम. बागल, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही. मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. यु. एम. राव, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली करवीर, गौरी महाजन व प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन केले तर सामुहिक पसायदान गायनाने सांगता करण्यात आली. या पसायदानाचे वाचन श्रीराम पतंगे यांनी केले.
0 Comments