पंढरपूर(प्रतिनिधी)
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बालमित्र पूर्व प्राथमिक शाळा, पंढरपूर येथे देशभक्तीच्या उत्साहात ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त समाजसेवक डाॅ.मुजम्मील कमलीवाले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तिरंग्याचे अभिमानाने फडकावण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील लहानग्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व कवितांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले. निरागस चेहऱ्यावरील आनंद आणि देशप्रेमाने भारलेले स्वर यांनी वातावरण भारावून टाकले.
आपल्या भाषणात समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, "देशाचा भविष्यासाठी मजबूत पाया म्हणजे शिक्षित, सुसंस्कारित आणि जबाबदार पिढी तयार करणे."
डॉ. कमलीवाले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि पालकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक, परिसरातील नागरिक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
0 Comments