पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत ‘स्वतंत्रता महोत्सव रॅली’च्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
संपुर्ण देशामध्ये दि.०२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘हर घर तिरंगा अभियान’ साजरा करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या जनजागृती रॅलीची सुरवात ही भारत मातेच्या फोटो पूजनाने झाली. रॅलीचे उदघाटन स्वेरीच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य डॉ. व्ही. जे. कुलकर्णी आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सदरची जनजागृती रॅली गोपाळपूर गावात गोपालकृष्ण मंदिर परिसरात संपन्न झाली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान आदी देशप्रेमाच्या घोषणा देण्यात आल्या. या रॅलीमध्ये गोपाळपूरचे विक्रम आसबे, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे, प्रा. गिरीश फलमारी, प्रा.प्रवीण मोरे, इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, एन.एस.एस. स्वयंसेवक तसेच सर्व जवळपास १२४ विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यावेळी देशप्रेमाविषयी व भारताच्या फाळणीमुळे झालेल्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती.
0 Comments