LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी घेतली शरद पवारांची भेट**(दिल्लीत निवासस्थानी भेट, रंगली चांगलीच चर्चा)**आमदार अभिजीत पाटील यांचे केले कौतुक*


प्रतिनिधी/- 

आज दिल्ली येथे देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे *खा. शरदचंद्र पवार* यांची पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी सदिच्छा भेट घेतली. 

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगणीक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.  ऊस, केळी, द्राक्षे, डाळिंब, केळी AIसंशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी मार्गदर्शन केले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क करून मतदारसंघातील करत असलेल्या कामांविषयी तोंडभरून कौतुक केले. अधिवेशनामध्ये अभ्यासपुर्ण प्रश्न उपस्थित करत आहेत यांची देखील नोंद पवार यांनी घेतली आहे. यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले..

यावेळी दिनकर चव्हाण, संभाजी भोसले, दशरथ जाधव, सुरेश भुसे, अशोक तोंडले, अशोक घाडगे, सिताराम गवळी, कालिदास साळुंखे, दत्तात्रय नरसाळे, नवनाथ नाईकनवरे, धनंजय काळे, साहेबराव नागणे, बाळासाहेब हाके, जनक भोसले, सिद्धेश्वर बंडगर, विठ्ठल रणदिवे, प्रवीण कोळेकर, सचिन वाघाटे, सचिन पाटील, तानाजी बागल, समाधान गाजरे,  महेश खटके, गणेश ननवरे, उमेश मोरे, धनाजी खरात तसेच धाराशिवचे संचालक संतोष कांबळे, भागवत चौगुले, सुरेश सावंत, संदीप खारे, संजय खरात, सुहास शिंदे यांनी भेट घेतली.

Post a Comment

0 Comments