पंढरपूर, कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर करण्यात पंढरपूर शहरातील नामवंत वकील राजेश चौगुले यांचा सिंहाचा वाटा आहे एडवोकेट राजेश चौगुले यांनी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर येथे नामदेव पायरीचे दर्शन घेऊन तसेच विठुरायाला साखळी घालून हजारो वकिलांच्या संख्येने कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिर येथे अंबाबाई यास अभिषेक घालून लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन होण्याबाबत सरकारला विनंती केली होती . त्यांच्या प्रयत्नांना व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या बद्दल पंढरपूर शहर पोलिस निरिक्षक विश्वजित घोडके यांनी अॕड राजेश चौगुले यांचा सत्कार केला. या वेळी संतोष वाघमारे, आनंद चौगुले, मित्र परिवार उपस्थित होते.
0 Comments